Home नाशिक पिंगळवाडे प्राथमिक उपकेंद्राची दुर्दशा.

पिंगळवाडे प्राथमिक उपकेंद्राची दुर्दशा.

141

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0033.jpg

पिंगळवाडे प्राथमिक उपकेंद्राची दुर्दशा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
प्राथमिक आरोग्य केंद्र ताहाराबाद अंतर्गत येणारे आरोग्यवर्धिनी केंद्र पिंगळवाडेची भयानक दुरावस्था.
पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, डोलबारे या गावांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिंगळवाडे येथे आहे. ह्या आरोग्य केंद्राची निर्मिती साधारण 30 ते 35 वर्षापासून झाली आहे. संबंधित गावातील नागरिक याच केंद्रात उपचारासाठी येत असतात. परंतु मागील वर्षी जे काही वादळ आले होते त्या वादळात या केंद्राची दुरवस्था झाली. या केंद्राच्या वरती सिमेंटचा स्लॅप आहे.परंतु हा स्लॅप पुर्णपने नादृष्त असल्यामुळे जिल्हा परिषद विभागाने पत्रे टाकले होते.परंतु मागील वर्षाच्या वादळामुळे पत्रे उडाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी सततच्या होणाऱ्या पावसामुळे या केंद्रात आज रोजी पूर्णपणे पाण्याची गळती होत आहे. तसेच या गळतीमुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही. तसेच या केंद्रात महिन्याच्या पहिल्या मंगळवारी लसीकरण सत्र लहान बालकांसाठी होत असते हे लसीकरण सत्र घेण्यास सुद्धा जागा शिल्लक नाही. त्याचप्रमाणे येथे कोविड लसीकरण होत असते परंतु या अवस्थेत कुठलेही रुग्णांवर उपचार होऊ शकत नाही. या केंद्राच्या खिडक्यांची काचे पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत आहेत याबाबत संबंधित जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांना सूचना दिल्या आहेत पण मात्र संबंधित विभाग याकडे पूर्णपणे डोळे झाक करताना दिसत आहे. हे असंच चालू राहिले तर रुग्णांनी तक्रार करावी कोणाकडे. या बाबत संबंधीत आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Previous articleलखनु नैताम कुंटुबियांना तहसिलदारांनी दिली सानूग्रह मदत- कुटुबियांना आधार।
Next articleपिंगळवाडे येथील वन विभागात वृक्षारोपणास सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.