Home गडचिरोली लखनु नैताम कुंटुबियांना तहसिलदारांनी दिली सानूग्रह मदत- कुटुबियांना आधार।

लखनु नैताम कुंटुबियांना तहसिलदारांनी दिली सानूग्रह मदत- कुटुबियांना आधार।

130

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0049.jpg

लखनु नैताम कुंटुबियांना तहसिलदारांनी दिली सानूग्रह मदत- कुटुबियांना आधार।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : धानोरा येथिल लखनू नैताम यांच्या झोपडीवर दिं 12 /7 /2022 च्या राञी अंदाजे 2 वाजता मोठे झाड कोसळले,सर्वञ अंधार, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊस असा अवस्थेत जवळच राहणाऱ्या शंकर मंडल नायक नागरिकाने टार्च्…. च्या उजेडात त्या कुंटुबियांना झोपडित फसलेल्या अवस्थेमधुन बाहेर काढले.सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.तहसीलदार धानोरा यांनी घटनास्थळाला भेट दिली चौकशी केली. व आज दिं. 15/7 /2022 रोजी नैताम कुंटुबियांना अन्यधान्य तेलाची सानुग्रह मदत केली.

अतिवृष्टीमुळे लखनू नैताम यांचे झोपडिवर झाड कोसळल्याने नैताम कुंटुबियांचे संसार उघड्यावर पडले ऐन पावसाळ्याच्या दिवसात काय करावे ? असा प्रश्न या कुटुबियांना पडला. आज 15/ 7/ 2022 रोजी तहसील कार्यालय धानोरा कडुन सानूग्रह मदत म्हणुन तहसीलदार डि.एम.वाकुडकर यांच्या हस्ते संसारोपयोगी अन्नधान्याचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सामाजीक कार्यकर्ते सोपानदेव म्हशाखेञी,मंडळ अधिकारीएस व्ही सरपे, पुरवठा निरिक्षक सा.एस प्रधान,तलाठी अविनाश कोडापे,पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुन,कुमारी कोडी मैश्राम,कोतवाल मारोती पदा,लखनु नैताम, विमल पदा,उपस्थित होते.पाण्यावल्या नजरेतुन कुंटुबियांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous articleशेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती, साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा
Next articleपिंगळवाडे प्राथमिक उपकेंद्राची दुर्दशा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.