Home नांदेड शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती, साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा

शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती, साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0034.jpg

शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती,
साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर चालू आहे. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पेरणी केली आहे. अशा पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचल्याने शेतामधील पिके कुजण्याची भीती आहे. त्यामुळे हे पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील 93 महसुल मंडळापैकी 80 मंडळात अतिवृष्टी झाली असून अनेक शेतात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनात घरघुती सोयाबीन बियाणे वापर , बीज प्रक्रिया करून योग्य खोलीवर पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्र, सरी वरंबा वर टोकन पद्धतीने लागवड तसेच बेडवर टोकन यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन शेताबाहेर काढण्यास मदत झाली, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमिनीत पाणी साचत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. या पाण्यामुळे पिकांची मुळाद्वारे श्वसनक्रिया मंदावते व पिकाला अन्नद्रव्ये घेता येत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. यात सोयाबीन,कापुस व तुर यांसारख्या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक सुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेऊन हा धोका टाळणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी जमिनीत वापसा झाल्यानंतर दर सहा ओळींनंतर कोळप्याच्या जानोळयाला दोरी गुंडाळून मृतसरी काढून घ्यावी. मृतसरी काढून घेतल्यास पडलेल्या पावसाचे पाणी सरीद्वारे शेताबाहेर निघून जाईल व पिकांचे नुकसान टाळता येईल. तसेच साचलेले पाणी लवकर शेताबाहेर कसे काढता येईल, याबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Previous articleपिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन
Next articleलखनु नैताम कुंटुबियांना तहसिलदारांनी दिली सानूग्रह मदत- कुटुबियांना आधार।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here