Home नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली जंबो कोविड सेंटरची पाहणी तीन दिवसांत रूग्णसेवेत...

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली जंबो कोविड सेंटरची पाहणी तीन दिवसांत रूग्णसेवेत रुजू होणार रेमडेसिविरबाबत आरोग्य मंत्र्याशी चर्चा सेवाभावी संस्थांना सहकार्याचे आवाहन

83
0

राजेंद्र पाटील राऊत

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली जंबो कोविड सेंटरची पाहणी

तीन दिवसांत रूग्णसेवेत रुजू होणार
रेमडेसिविरबाबत आरोग्य मंत्र्याशी चर्चा
सेवाभावी संस्थांना सहकार्याचे आवाहन
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)
नांदेड, दि. १५ एप्रिल २०२१:

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथील भक्ती लॉन्समध्ये युद्धपातळीवर उभारण्यात येत असलेल्या जंबो कोविड सेंटरची पाहणी केली. पुढील तीन दिवसांत हे सेंटर रूग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

चव्हाण यांनी गुरूवारी सायंकाळी या कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुमारे २०० खाटांच्या या जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन तसेच बायपेप व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असणार आहे. येथील सर्व सुविधांच्या उभारणीची त्यांनी विस्तृत माहिती घेतली. यावेळी आ. अमर राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकारी, इतर प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींशी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनी करून नांदेड जिल्ह्याला अधिक प्रमाणात रेमडेसिविरच्या पुरवठ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. टोपे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे ते पालकमंत्र्यांना म्हणाले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच रूग्णालये व कोविड सेंटरच्या बाह्य व्यवस्थापनामध्ये सेवाभावी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासंदर्भातही याप्रसंगी चर्चा झाली. कोरोना संदर्भात जनजागृती करणे, कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे आदी कामांसाठी सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज
Next articleमोठी बातमी: आता कडक लॉकडाऊनच्या हालचाली..!दोन दिवसांत उचलणार कठोर पावले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here