Home कोल्हापूर भटके समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न

भटके समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न

135

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0029.jpg

कोल्हापूर,( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): ता.हातकणंगले येथील शामराव पाटील शिक्षण समुह विद्यालयात भटका समाज मुक्ती आंदोलन या सामजिक संघटनेच्या वतीने विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील व इतर घटकातील वंचीत गरजु ७१ कुटूंबाना अन्नधान्य वितरण अधिकारी संजय पुजारी व भटका समाज मुक्ती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव साठे यांच्या हस्ते शिधापत्रिका वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये हातकणंगले तालुक्यातील तळसंदे, पारगाव,टोप,नागाव, पुलाची शिरोली व पेठवडगाव येथील वंचीत कुटूंबियांचा समावेश होता.
स्वागत विश्वजित साठे यांनी करत प्रास्ताविकातुन संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
भटका समाज मुक्ती आंदोलन संघटना व सहा.आयुक्त समाजकल्याण विभागाच्या प्रयत्नातुन जिल्हाधिकारी कोल्हापुर यांनी दिलेल्या निर्देशानुसार हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडून कर्तव्यदक्षपणाने पुर्तता करून गोरगरीबाना न्याय दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष भिमराव साठे यानी प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी बेबीताई गोसावी,सुजाता काळोखे,रेखा गोसावी, सोनम वडर,मंगल मोरे, कमल वायदंडे,संजय चव्हाण,सीता साळोखे, भारती चव्हाण,शालन चव्हाण,रंजना हाके, सारीका माळवी,सविता गोसावी,अनिल पोवार, निवास पोवार,अजय जाधव,विकास चौगुले, बाळासो पोवार,उषा मोरे, आक्काताई इंगळे आदी वंचीत समाज बांधवांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन काजल इंगळे यांनी केले तर विकास शिंदे यानी आभार मानले.

Previous articleगौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले
Next articleकंचनपुर येथे कृषी अधिकारीकडून पुरपाण्याची पाहणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.