• Home
  • 🛑 *खडकवासल्यातून साडेतीन हजार क्युसेक पाणी सोडले* 🛑

🛑 *खडकवासल्यातून साडेतीन हजार क्युसेक पाणी सोडले* 🛑

🛑 *खडकवासल्यातून साडेतीन हजार क्युसेक पाणी सोडले* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत दिवसभरात तीन हजार 424 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. धरणक्षेत्रांत असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाजया टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण 29.13 अब्ज घनफूट (टीएमसी) 99.94 टक्के पाणीसाठा झाला आहे.

वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण 99.55 टक्के भरले आहे. रविवारी रात्री टेमघर धरण परिसरात 45 मिलिमीटर, वरसगाव धरण क्षेत्रात 34 मि.मी., पानशेत धरण क्षेत्रात 35 मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात 58 मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली, तर खडकवासला धरण परिसरात 20 मि.मी. पावसाची नोंद झाली.

११ धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रीया सुरू
जिल्ह्यातील केवळ पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह या दोन धरणांचा अपवाद वगळता अन्य सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे सध्या 11 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, कासारसाई, खडकवासला, वीर आणि नाझरे या धरणांचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या 11 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे….⭕

anews Banner

Leave A Comment