• Home
  • 🛑 *झेप प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप* 🛑

🛑 *झेप प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप* 🛑

🛑 *झेप प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप* 🛑
✍️ पालघर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जव्हार :⭕झेप प्रतिष्ठान तर्फे मिशन २०२० अंतर्गत पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील बेहेड पाडा आणि सरोळी पाडा येथील दोन्ही आदिवासी पाड्यात जवळपास दोनशे मुलांना शालेय शिक्षण किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये बॅग, वह्या, पेन, पेन्सिल,खोडरबर, पाण्याची बॉटल, डबा, आलेख वह्या आणि प्रयोग वह्या इत्यादी गोष्टी आहेत.

या आदिवासी मुलांच्या शालेय शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून जे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात.

या सर्वांवर सून मुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि त्यांना आपलं भविष्य सुधारायला मदत मिळेल या हेतूने झेप प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

या उपक्रमाअंतर्गत अजूनही आठशे मुलांना अशाच प्रकारच्या शालेय शिक्षणाच्या वस्तुंचा वाटप येत्या काही आठवड्यात करण्यात येणार असून जवळपास नऊ शाळेतील एक हजार मुलांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

याप्रसंगी झेप प्रतिष्ठानचे डिंपल पटेल, संदीप गोळे, सिद्धांत बोचरे, अजय भोसले, अनिल औताडे, देवा जाधव, अर्चना औताडे, अर्चना शिंदे, योगेश खाकम, प्रशांत शिर्के, देवा पारेख, रोहित माळी, संतोष उतेकर, समीर कदम, राज जाधव, कृष्णा मुरमे सर आणि इतर शालेय शिक्षक उपस्थित होते अशी माहिती झेप प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री विकास धनवडे यांनी दिली..⭕

anews Banner

Leave A Comment