• Home
  • 🛑 कोथरूड मधे साठलेत कचऱ्याचे ढीग 🛑

🛑 कोथरूड मधे साठलेत कचऱ्याचे ढीग 🛑

🛑 कोथरूड मधे साठलेत कचऱ्याचे ढीग 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोथरूड हे आशिया खंडातील सर्वात वेगवान डेव्हलप होणारं उपनगर आहे. कोथरूडच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोथरूड नेहमी चर्चेत सुद्धा असते.

मात्र कोथरूड अजूनही काही प्राथमिक गोष्टीसाठी झुंज देताना दिसत आहे. मागील एक आठवडा उलटून गेला मात्र कचरा कुठं आणि कसा टाकावा याच नियोजन स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला करता आले नाही.

चांदणी चौकापासून मुख्य पौड रोडवर असे अनेक कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत. ओला कचरा असल्यामुळे त्याची दुर्गंधी 500 मिटर पर्यंत येत आहे. शास्त्रीनगर भागात कचऱ्यामुळे मच्छर वाढले आहेत.

कोरोना सारख्या महामारीमुळे अगोदरच कोथरूडकर हैरान असताना यात डेंग्यू, मलेरिया याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

प्रशासकीय किंवा राजकीय व्यक्तींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विभागातील नागरिकांची विनंती….🛑

anews Banner

Leave A Comment