• Home
  • तर लशीकरणास १८ वर्षे लागतील….!

तर लशीकरणास १८ वर्षे लागतील….!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210318-WA0008.jpg

🛑 तर लशीकरणास १८ वर्षे लागतील….! 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली : ⭕देशात केरोना लशीकरण वेगाने सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे.

दुसरीकडे, लशीकरणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोना लशीकरणाचा सध्याचा वेग पाहिला असता देशातील संपूर्ण नागरिकांना लस मिळण्यास 18 वर्षे लागतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. आतापर्यंत केवळ 0.35 टक्के नागरिकांनाच कोरोना लशीचा दुसरा डोस मिळाला असल्याचे सांगत राज्यसभेत काँग्रेस सदस्य शक्तिसिंह गोहिल यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

तसेच, देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोना लशीकरणाचा वेग पाहता देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचण्यास 18 वर्षे लागतील, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने लशीकरणावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेच्या स्थायी समितीनेही संथगतीने सुरू असलेल्या लशीकरणावर चिंता व्यक्त केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात 30 लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. तर, आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 47 हजार 432 जणांना कोरोना लस देण्यात आली. ⭕

anews Banner

Leave A Comment