Home नांदेड मुक्रमाबाद येथील मगदुम गुडूखा पठाण यांची मुखेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष...

मुक्रमाबाद येथील मगदुम गुडूखा पठाण यांची मुखेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड.

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0065.jpg

मुक्रमाबाद येथील मगदुम गुडूखा पठाण यांची मुखेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते मगदुम पठाण यानी केलेल्या सामाजिक कार्याची व पक्ष वाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पठाण यांची पक्षश्रेष्ठीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुखेड तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने सर्वस्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
नादेड येथे शनिवारी पक्षाच्या एका विषेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र मगदुम पठाण यांना देण्यात आले. यावेळी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष निरीक्षक सौ. आशाताई भिसे, राष्ट्रवादी युवकचे नांदेड पक्ष निरीक्षक निशांत वाघमारे, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, नांदेड शहराचे पक्ष निरीक्षक मगबुल सलीम, माजी सभापती भगवानराव आलेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पना डोंगळीकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, उमरी पं.स.चे माजी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर, प्रेमकुमार कौशल्ये, राष्ट्रवादी युवक नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, नांदेड राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रौफ जमीनदार, कार्याध्यक्ष संभाजी मुकनर, बंटी पाटील यांची उपस्थिती होती.
मुक्रमाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून गेल्या दहा वर्षापासून पक्ष वाढीच्या कामा बरोबर ते सामाजिक कामात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठनी पठाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुखेड तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.मगदुम यांच्या निवडी बदल ता.अध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब,गंगाधर चामलवाड,शिवशंकर पाटील कलबंरकर ,मझर पठाण,विनोद आपटे, हे रमाकांत पाटील, वि.ता.अध्यक्ष अमोल पाटील,बस्वराज येवते, बस्वराज स्वामी वंटगिरे, आकाश भंगे आदीने अभिनंदन करुण पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleअनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.
Next articleरस्ता सुरक्षा समिती तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे घेतली आढावा बैठक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here