Home बुलढाणा अनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.

अनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.

27
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0058.jpg

अनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.

संग्रामपुर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

” संग्रामपूर आणि तहसीलदार,मुख्याधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तत्काळ निलंबित करा”!!
,मागण्या करिता
14 जून2022 पासून पत्रकार राजेंद्र ससाणे यांचे बेमुदत आमरण उपोषण ,,,,,,! उपोषणाचा
पहिला दिवस,,,,
संग्रामपूर शहरातील शासकीय गट,220 सह पड,गायारान, सार्वजनिक रस्ते,मोकळी जागा,एन,ए,34/36 मधील संपूर्ण ओपन स्पेस, 214 जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात शासनाची जमीन बळकावली आहे, अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांना येण्या जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच रात्री बेरात्री रुग्णाला उपचारकरिता नेण्यासाठी रुग्ण वाहिकेला शहरात जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही,अतिरिक्त जागेवर बेकायदेशीर रित्या केलेले अतिक्रमण तात्काळ काढून अतिक्रमण धारकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा अस्या तक्रारी तहसीलदार मुख्याधिकारी यांचे दालनात बऱ्याच वेळा दिल्या परंतु सबंधित विभागाने आज पर्यंत कोणती ही कारवाई केली नाही, तसेच शासन निर्णय 07 सप्टेंबर 2010 मध्ये स्पष्ट पणे नमूद केले आहे की शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध,निषकाशित करणे,फिर्याद दाखल करणे,असे असताना संबंधित अधिकारी एकमेकावर आपली जबाबदारी ढकलत आहेत शासन निर्णय याला तहसीलदार व मुख्याधिकारी यांचे कडून केराची टोपली दाखवली जातआहे त्यामुळे संबंधित दोषी अधिकारी यांचेवर तत्काळ निलंबनाची,कारवाई करावी कारवाई न झाल्यास येत्या 14/6/2022,रोजी संग्रामपूर एस टी स्टँड वरील मोकळ्या जागेवर आमरण उपोषण करण्यात येईल असे दिनाक 18/5/2022 रोजी दिलेल्या तक्रारीत नमूदआहे व उपोषण काळात उद्भवलेल्या परिणामास आपण जबाबदार असा इशारा राजेंद्र ससाने यांनी निवेदनातून दिला होता,परंतु शासनाने व प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, अखेर लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई,पालक मंत्री बुलडाणा,आमदार संजय कुटे जामोद,उप,विभागीय अधिकारी ज,जा,तहसीलदार संग्रामपूर,मुख्याधिकारी नगर पंचायत संग्रामपूर, ठाणेदार पोलिस स्टेशन संग्रामपूर,ऍड,सतीशचंद्र rothe,शेख सईद संग्रामपूर तालुका पत्रकार संघ,यांना पाठविले आहे.

Previous articleपालकमंत्री अजित पवार यांना सभेत बोलू देण्यास नकार, हाच का मोदींचा प्रोटोकॉल
Next articleमुक्रमाबाद येथील मगदुम गुडूखा पठाण यांची मुखेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here