Home पुणे पालकमंत्री अजित पवार यांना सभेत बोलू देण्यास नकार, हाच का मोदींचा प्रोटोकॉल

पालकमंत्री अजित पवार यांना सभेत बोलू देण्यास नकार, हाच का मोदींचा प्रोटोकॉल

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0059.jpg

पालकमंत्री अजित पवार यांना सभेत बोलू देण्यास नकार, हाच का मोदींचा प्रोटोकॉल
पिंपरी (उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर माळवाडीत राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारक-यांची संवाद सभा घेण्यात आले. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू संस्थानाचे नितीन महाराज मोरे यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. पण सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. याप्रसंगी स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. मोदींनी अजित पवार तुम्ही बोेला असं म्हणाले. तरीही अजितदादांनी भाषण करायला नकार दिला. त्यामुळे आता अजित पवारांना भाषण का करु दिले नाही, याबाबत वारक-यामध्ये चर्चा रंगली आहे.

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी संत तुकारामांचे अभंग म्हणाले. यावेळी त्यांनी पालखी मार्गाचा आवार्जून उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात पुर्ण होईल. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी ३५० किलोमीटर असेल. त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देशात सरकारी योजनेचा लाभ सर्वांना सारखा मिळत आहे, त्यात कसलाही भेदभाव केला जात नाही असेही मोदी यावेळी म्हणाले.

Previous articleअमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत संग्रामपुर तहसील येथे कार्यक्रम संपन्न
Next articleअनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here