Home बुलढाणा अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत संग्रामपुर तहसील येथे कार्यक्रम संपन्न

अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत संग्रामपुर तहसील येथे कार्यक्रम संपन्न

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0039.jpg

अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत संग्रामपुर तहसील येथे कार्यक्रम संपन्न

संग्रामपूर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपूर:- सन्माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक तसेच शाहिद विधवा पत्नी विशिष्ट सेना सेवा मेडल्स तसेच जे सैनिक आपल्या परिवारापसुन दुर देशसेवेसाठी रात्रंदिवस लढत आहेत, आपल्या साठी// अमृत जवान सन्मान//अभियान प्रत्येक तालुक्यात राबविण्याचे आदेश दिले आहेत.त्या आदेशानुसार काल दिनांक 13/6/2022ला सकाळी अकरा वाजता संग्रामपूर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व सन्माननीय आजी माजी सैनिक , शहिदांच्या परिवारातील सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीत तहसीलदार वरणगांवकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीला सन्माननीय नायब तहसीलदार चव्हाण साहेब, तसेच संग्रामपूर चे भुमिअभिलेख अधिकारी पारधे साहेब, तसेच संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा येथील शहिद जवान सन्माननीय चंद्रकांत भाकरे यांचे वडील भगवंत भाकरे हे होते, तसेच विशेष निमंत्रित माजी सैनिक अरुण निंबोळकर तसेच माजी सैनिक अशोकराव पाटील, कारगिल योद्धा,माजी सैनिक बोदळे साहेब, माजी सैनिक इंगळे साहेब माजी सैनिक धर्मे साहेब, माजी सैनिक माळोकार साहेब, माजी सैनिक सुभेदार गजानन अस्वार साहेब, माजी सैनिक गावंडे साहेब माजी सैनिक,राजु बोदळे साहेब, माजी सैनिक पवार हे होते.कार्यक्रमाचे संचलन डॉ सरोदे साहेब यांनी केले, तसेच तहसीलदार साहेबांनी सर्व सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, विशेष शहिद चंद्रकांत भाकरे यांचे वडील भगवंत भाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.माजी सैनिकांनी सन.माननिय सर्व अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त आणि लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन दिले.तसेच विशेष निमंत्रित माजी सैनिक अरुण निंबोळकार यांनी सैनिकांना देशसेवा करतांना कोणकोणत्या समस्यांना लढा द्यावा लागतो, तसेच काही सैनिक सेवेतील अनुभव सांगितले, तेव्हा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मण भारावून गेले होते.सैनिकाच्या व्यथा ऐकून कार्यक्रमातील सर्व थोडावेळ स्तब्ध झाले होते, शेवटी शहिद चंद्रकांत भाकरेंना सर्वांनी ऊभे राहून दोन मिनिटे श्रध्दांजली वाहिली, आणि चंद्रकांत भाकरे अमर रहे अशा घोषणा दिल्या. शेवटी नायब तहसीलदार चव्हाण साहेबांनी आभार प्रदर्शन केले.

Previous articleशेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू
Next articleपालकमंत्री अजित पवार यांना सभेत बोलू देण्यास नकार, हाच का मोदींचा प्रोटोकॉल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here