*देगलूरच्या करडखेड भागात अवैध धंदे तेजीत,पोलिसांची मिलीभगत* देगलूर (संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील करडखेड गावामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला असून ,येथील पोलिस चौकीचे बीट जमादार सर्वांचे हप्ते घेऊन डोळे असून आंधळ्याची भूमिका बजावतात .हे गाव तेलंगाना, कर्नाटक ,महाराष्ट्र ,अशा तीन सीमेवर असून या गावची लोकसंख्या जवळपास सहा हजारच्या वर आहे .येथे तेलंगणातील स्वस्त दारू आणून बरेच बिनदास्त विकत असतात आणि कर्नाटकमध्ये गुटखा चालू असल्यामुळे तेथून रोज ऑटो गाड्यांनी आणून येथून जवळपास बावीस खेड्यांना सप्लाय करत असतात .या गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधिन होत आहेत. पहिलेच संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात असून त्यात तरुण पिढीला व गोरगरिबांच्या हाताला काम नसून त्यांचे संसार उघड्यावर येण्याच्या मार्गावर आहेत गावातील जनतेच म्हणणे असे आहे की,आतापर्यंत बरेच येथे जमादार येऊन गेले पण एवढे धंदे पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहेत .हे अधिकारी फक्त “तुम्ही जगा व मला जगवा “हे मंत्र अवलंबिले आहे .यांना तरुण पिढीचे व गोरगरिबांचे काहीच देणे घेणे नसून ,आपली स्वतःची झोळी भरण्याचा मार्ग अवलंबिले आहेत. या अशा अधिकाऱ्यांची लवकरात लवकर येथून बदली करून एक सक्षम अधिकारी देण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे येथे बनावट शिंदी ची बरीच दुकाने असून त्या शिंदीचे रिकामी झालेले(पिशवी) कॅरीबॅग बिंदास गावाभोवती रोडच्या कडेला टाकत असून ही कॅरीबॅग जर मुक्या जनावरांनी खाल्ली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण?असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होतआहे .जर बाहेरून आलेला एखादा नवीन माणूस जर गावात येत असेल ,तर त्यांना गावांमध्ये काय काय भेटते हे सांगण्याची गरज पडत नाही. येथे बनावट सिंधी, तेलंगणातील दारू, गावठी दारू, गुटखा ,मटका, जागोजागी पेट्रोल, अशी अनेक धंदे चालतात तरी हे सर्वच लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी गावातील जनतेची मागणी आहे
