• Home
  • 🛑 महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडीच्या ताब्यात 🛑

🛑 महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडीच्या ताब्यात 🛑

Anshuraj patil

IMG-20210318-WA0010.jpg

🛑 महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडीच्या ताब्यात 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे. :- ⭕समृद्ध जीवनचे महेश मोतेवार याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला काही वर्षांपूर्वी दान केले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले.

धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवार याने 2013 मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशूल, परसू असे 60 लाख 50 हजार रुपयांचे दीड किलो सोन्याचे दागिने अर्पण केले होते. हे दागिने त्याने  ठेवीदारांकडून घेतलेल्या पैशांमधून बनवून घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते.
महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवन मल्टी स्टेट पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांचे आमिष दाखवत देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना तब्बल 2 हजार 512 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणात मोतेवार याला 2015 साली अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मोतेवार ची चौकशी सुरू असताना त्यांनी पैशाचा वापर कोठे केला याचा तपास पोलीस घेत होते. यावेळी त्याने दगडूशेठ गणपतीला 2013 साली दिलेले दागिने हे लोकांची फसवणूक केलेल्या पैशातूनच घेतल्याचे सिद्ध झाले.

त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी हे दागिने तपासासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ला सांगितले. त्यानुसार हे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. ⭕

anews Banner

Leave A Comment