• Home
  • 🛑 मोठी बातमी…! महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी :- रेल्वेमंत्री पीयुष गोयल 🛑

🛑 मोठी बातमी…! महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी :- रेल्वेमंत्री पीयुष गोयल 🛑

🛑 मोठी बातमी…! महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी :- रेल्वेमंत्री पीयुष गोयल 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ल़ॉकडाऊनपासून सामान्य नागरिकांना प्रवासासाठी लोकल बंद आहे. त्यात खासगी क्षेत्रातील महिलांचे कामावर जाताना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वाहतूककोंडीत अनेक तास अडकून पडावे लागत असल्याने त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

त्यामुळे वेळेचे नियोजन करून महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असं विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डला केलं होते. मात्र राज्य सरकारची ही विनंती रेल्वेनं फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर आता महिलांना ‘दोन टप्प्यांत’ लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयीष गोयल यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकांउटवरून दिली आहे.

पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.११ ते दु.३ दरम्यान आणि सायकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत” असं गोयल यांनी म्हटलं आहे….⭕

anews Banner

Leave A Comment