• Home
  • संपर्क चाचण्यांमूळे शहरात वाढतायत रुग्णसंख्या …जिल्हाधिकारी! ✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

संपर्क चाचण्यांमूळे शहरात वाढतायत रुग्णसंख्या …जिल्हाधिकारी! ✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 संपर्क चाचण्यांमूळे शहरात वाढतायत रुग्णसंख्या …जिल्हाधिकारी!🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक :⭕ कोरोना महामारीवरील उपाययोजनांचा भाग म्हणून शहरात गेल्या काही दिवसांत संपर्क चाचण्या (कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग) वाढविल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जितके पॉझिटिव्ह रुग्ण अधिक सापडतील, तितका पुढील संसर्गाला अटकाव झाला, असे समजणे अधिक योग्य आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

शहरातील रुग्णसंख्या एक हजार 32
मालेगावात समर्थ कॉलनी कॅम्पातील 65 वर्षीय वृद्धाचा फरहान हॉस्पिटलमध्ये, जाखोरी येथील 75 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात आणि करंजगाव (ता. निफाड) येथील 52 वर्षीय रुग्णाचा डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी 39 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरित रुग्णांमध्ये जिल्ह्यातील येवला येथे सर्वाधिक आठ, तर इगतपुरी तालुक्‍यात चार रुग्ण वाढले. यात टाकेद व इगतपुरीतील रेल्वे ग्राउंड परिसरातील प्रत्येकी दोघे आहेत. नाशिक तालुक्‍यातील जाखोरी, गोवर्धन, विंचूरगवळी, तसेच पिंपळगाव बसवंत व वणी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. नाशिक शहरात पुन्हा 22 रुग्णांची भर पडली. यापैकी वडाळा रोडच्या फकीरवाडीतील 65 वर्षीय वृद्धाचा गेल्या बुधवारीच मृत्यू झाला आहे.
निगेटिव्ह अहवालांतून मालेगावकरांना दिलासा

मालेगाव : शहरातील 85 संशयितांचे कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू असून, कॅम्प भागातील समर्थ कॉलनी येथील 65 वर्षीय पुरुषाचा फरहान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या 70, तर संशयित मृतांची संख्या 39 झाली आहे. शुक्रवारी नव्याने 43 जणांचे स्वॅब घेण्यात आले. शहरात 59 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने पाच रुग्ण दाखल झाले, तर दोघांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 771 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शहरातील 103 अहवाल प्रलंबित आहेत. कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात 13 जण क्वारंटाइन आहेत. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून जाधव विद्यालय प्रशासनाने ताब्यात घेतलेले असून, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्तांनी शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यालय संस्थेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली आहे…⭕

anews Banner

Leave A Comment