• Home
  • *इचलकरंजी आगारातील अन्नदात्यांनी* *जपली सामाजिक* *बांधिलकी

*इचलकरंजी आगारातील अन्नदात्यांनी* *जपली सामाजिक* *बांधिलकी

*इचलकरंजी आगारातील अन्नदात्यांनी* *जपली सामाजिक* *बांधिलकी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ* *युवा मराठा न्युज)*

इचलकरंजी आगारातील कर्मचाऱ्यांनी बाहेरील आगारातून आलेल्या एस.टी. मालवाहतुक चालकांना मोफत जेवनाची सोय केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात एस.टि.प्रवासी वाहतुक बसेस बंद असलेने तसेच रा.प. एस.टी.ने नविन मालवाहतुक सुरू केली आहे. महाराष्ट्रातील बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या चालकांना कोरोनामुळे हाँटेल बंद असलेने चालकांच्यावर उपासमारीचे वेळ येऊ लागल्याने इचलकरंजी आगारातील चालकवाहकानी मोफत जेवनाची सोय करून एक आदर्श निर्माण केला .
यामध्ये दानशूर अन्नदाते श्री .अशोक शेळके(वाहक) , राजु शिनगारे (वाहक), ज्ञानेश्वर दाभोळे (चालक), सचिन कोकरे(चालक) यांनी स्व खर्चातुन बाहेरील आगारातील आलेल्या मालवाहतुकीचे चालकांना सुमारे ४१ जणांना मोफत जेवनाचा लाभ मिळाला आहे.
आज आगारामधे जेवनाच्या डब्यांचे बिलाची रक्कम इचलकरंजी आगारातील आकाऊंटच्या सौ. गावडे मँडम यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी एस आर बुढ्ढे , आर.एस.नाईक , एम.एस. शिंदे ,कुलकर्णी ,मेघा गायकवाड , अशोक शेळके ,राजु शिनगारे , ज्ञानेश्वर दाभोळे ,कँशिअर शेख , इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून या चारही अन्नदात्यांचे कौतुक होत आहे.

anews Banner

Leave A Comment