Home सोलापूर सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0061.jpg

सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap.

सोलापूर – शासकीय कामकाजासाठी पुण्याला निघालेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात एका अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे अव्वल कारकून गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते.
दरम्यान ते भिगवण जवळ गेले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, कंटेनरची धडक झाली, त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. मात्र उपचार सुरू असताना उमेश वैद्य यांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला. त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे नव्हते.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी भारत सोनकांबळे यांची निवड
Next articleवृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here