Home बुलढाणा वृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार

वृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0062.jpg

वृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा,  : भारत वृक्ष क्रांती मोहिमेतून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. या उपक्रमामुळे किशोर वयात वृक्ष लागवडीबाबत विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडणार असल्याने या मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड उपक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम भादोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडला. यावेळी सरपंच प्रमोद वाघमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, विभागीय वनाधिकारी बी. एन. पायघन, गटशिक्षणाधिकारी संजय पवार, विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, मुख्याध्यापक गजानन कंकाळ, समन्वयक ए. एस. नाथन, पोलिस पाटील सुर्यकांत गवई आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, विद्यार्थ्यांकडून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही अतिशय चांगली बाब आहे. वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धन होणा आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव होईल. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. शिक्षणातील सहभागामुळे गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे आणि समन्वयक ए. एस. नाथन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राजभवन येथे कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेले शाजीया हरून, सोमनाथ ठेंग यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleसोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू
Next articleघर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here