Home महाराष्ट्र एसटीतील २,६०० चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांसमोर आर्थिक संकट : प्रशिक्षण पूर्ण,...

एसटीतील २,६०० चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांसमोर आर्थिक संकट : प्रशिक्षण पूर्ण, मात्र भरती प्रक्रिया रखडली

105
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटीतील २,६०० चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांसमोर आर्थिक संकट : प्रशिक्षण पूर्ण, मात्र भरती प्रक्रिया रखडली

ठाणे : (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागल्याने चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा थांबली.गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशा वेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने त्यावरील स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठवली होती.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एसटीतील २,६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रि या रखडली आहे. चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांचे प्रशिक्षण होऊनही अनेक जण अद्यापही एसटीत रुजू होऊ शकलेले नाहीत. या पदाच्या उमेदवारांना सेवेत घेण्याचे महामंडळाकडून वारंवार आश्वासन दिले जात असून अनेकांनी विविध खासगी कं पन्यांमध्ये असलेली नोकरी सोडून एसटीतील या नोकरीसाठी प्रयत्न के ले. परंतु तीदेखील न मिळाल्याने या उमेदवारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागल्याने चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा थांबली. असे एकू ण २,६०० हून अधिक उमेदवार असून यात काहींचे प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी बाकी आहे. तसेच अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असलेलेही उमेदवार आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार आहेत.
चालक तथा वाहक या पदासाठी ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, ते इतर ठिकाणी नोकरी करीत होते. ते नोकरी सोडून सरकारी नोकरी म्हणून एसटीमध्ये भरती झाले. टाळेबंदीमुळे अनेक खासगी वाहतूक कंपन्यांचा व्यवसाय अडचणीत आणि ते व्यवसाय बंद करून बसले आहेत. आता या चालक कम वाहकाना रोजगार मिळणे मुश्कील होऊन बसले आहे. त्यांना एसटी महामंडळाने तात्काळ कामावर घेतले पाहिजे
चालक कम वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना सेवेत घेण्यासंदर्भात लवकरच एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.
– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Previous article“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” उदयनराजे संतापले
Next articleवाखारी ते देवळा बससेवा सुरु ग्रामस्थांच्या .. मागणीला सुयश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here