Home बुलढाणा घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0063.jpg

घर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा,  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख घरांवर झेंडा उभारण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सर्वांना झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र आणि राज्यस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अधीक्षक शामला खोत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांमध्ये स्वातंत्र्याचा उत्साह निर्माण करून त्यांच्यात देशभावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आलेले स्वातंत्र्यसैनिक, माजी-आजी सैनिक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांबाबतची माहिती प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. यासोबतच दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व नागरिक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणतील. या उपक्रमात ग्रामसभेची विशेष सभा, वारसास्थळांच्या पदयात्रा, लोकोत्सव, संविधान स्तंभ उभारणे, आजी-माजी सैनिकांच्या समस्यांसाठी विशेष शिबीर, अमृत सरोवर घेण्यात येतील.

हर घर तिरंगा उपक्रम राबविताना नागरिकांना ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती व्हावी, यासाठी ध्वज विक्रीच्या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे नागरिकांना ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी खादी ग्रामोद्योग आणि बचत गटांशी संपर्क साधून त्यांना ध्वज निर्मितीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी स्वस्त धान्य दुकानातूनही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, नागरिकांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Previous articleवृक्ष लागवड मोहिमेतून पर्यावरण स्नेही विद्यार्थी घडणार
Next articleआमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here