Home नाशिक आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध

आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0050.jpg

आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्यात पहिली ग्रामपंचायत बिनविरोध
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेनेतच शिंदे गट स्थापन झाला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे शिंदे गटात सामील झाले.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मोठे वर्चस्व आहे. सत्ता पालट झाल्यानंतर आमदारांच्या नेतृत्वात तालुक्यातील पहिली श्रीराम नगर ही ग्रामपंचायत बिनविरोध विजय झालेली आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी सभापती सौ सुमनताई निकम श्री विष्णू निकम यांच्या नेतृत्वाखाली सदर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडीमुळे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या गटात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
बिनविरोध विजयी झालेल्या सदस्यांचे नावे
अतुल विष्णू निकम, अर्चना सुभाष गायकवाड, शुभांगी विजय महाजन, शुभम सुनील महाजन, कमल सुधाकर राऊत, सागर वाल्मीक राऊत, नंदा बाळासाहेब खैरनार, असे आहेत.
बिनविरोध विजयी झालेल्या सदस्यांचे तेज कवडे, किरण देवरे, प्रमोद भाबड, राजेश कवडे, विलास आहेर, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती सुभाष कुटे, अमोल नावंदर, सोमनाथ घोंगणे, यांनी अभिनंदन केले.

Previous articleघर तिरंगा उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा
Next articleमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here