• Home
  • आघाडी शासनाचा व विजवितरण कंपनीचा निषेध करत देवळयात भाजपाचे रास्तारोको आंदोलन

आघाडी शासनाचा व विजवितरण कंपनीचा निषेध करत देवळयात भाजपाचे रास्तारोको आंदोलन

राजेंद्र पाटील राऊत

20201204_182524.jpg

आघाडी शासनाचा व विजवितरण कंपनीचा निषेध करत देवळयात भाजपाचे रास्तारोको आंदोलन
देवळा:- (भिला आहेर  प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) वीज वितरण  कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकारी वर्गात प्रचंड असंतोष पसरल्याने आज ह्या असंतोषाचा उद्रेक थेट रास्तारोको आंदोलनात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत आंदोलनाला सुरुवात झाली.आमदार डॉ. राहुल आहेर ,भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर व देवळा तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देवळा पाचकंदील हे येथे रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.शेतीपंपासाठी दिवसा व अखंडित विज मिळावी.नादुरुस्त झालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बसविण्यात यावेत ह्या आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या .सुमारे एक तास चाललेल्या ह्या रास्तारोको मुळे सटाना – नाशिक रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ,विजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भोये व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक आहेर,भाजपा देवळा शहराध्यक्ष अतुल पवार,संभाजी आहेर,किशोर आहेर,दिलीप पाटील, नानू आहेर,पुंडलिक आहेर,दादाजी बोरसे,अण्णा शेवाळे,सुनील देवरे, कौतिक पवार, भाऊसाहेब पगार,,केदा शिरसाठ,दयाराम सावंत,मुन्ना अहिरराव,नदीश थोरात, संतोष मोरे,मनेश ब्राम्हणकार, विकास ठाकरे,भिका बोरसे,राजेंद्र केदारे,भिका बोरसे,शिवाजी अहिरे, यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.( उद्या बघा व्हिडीओ बातमी)

anews Banner

Leave A Comment