• Home
  • यादव आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर , शिक्षक उमेदवार विजयाचा जल्लोष

यादव आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर , शिक्षक उमेदवार विजयाचा जल्लोष

 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने लढत पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये झाली. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारताना भाजपच्या ताब्यात असलेल्या पदवीधर मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आहे. यामध्ये  कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री मा.सतेज पाटील हे विजयाचे शिल्पकार असुन  मतदारसंघात महाविकास आघाडीचे नुतन आमदार मा.श्री.अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे नुतन आमदार मा.श्री. जंयत आसगावकर भरघोस मतानी विजयी झाले आहे या विजयाचा आंनदोत्सव साजरा करणेसाठी यादव आघाडीच्या नेत्या माजी.नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ आणि यादव आघाडीचे कार्यकर्ते यांनी पेठ वडगांव मधिल यादव वाडा येथे फटाक्याची आतषबाजी व विजयाचा गुलाल लावून , साखर वाटून साजरा करणेत आला यावेळी यादव आघाडीच्या सौ.विद्याताई पोळ म्हणाल्या आता पुढच्या येणाऱ्या  आगामी वर्षी आपणाला अशाच पद्धतीने यादव आघाडीचा विजयाचा झेंडा येथून पुढील सर्व  निवडणूकीमधे फडकवायचा आहे अशी यादव आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची तिव्र इच्छा आहे आणि आता आपण सर्वांनी आत्तापासुनच कामाला लागायची तयारी करा असे आवाहन  यावेळी करण्यात आले.
वडगांव शहरातुन विजय रँली काढून नगरपालिका चौकातुन माजी. नगराध्यक्ष  स्व.विजयसिंह यादव साहेबांच्या यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेण्यात आला.
यावेळी शाहूशिक्षण संस्थेचे कार्यवाहक अभिजीत गायकवाड ,माजी.उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्तर , रायसिंग भोसले , पत्रकार विवेक दिंडे, छायाचित्रकार  सतोष माळवदे ,धनाजी केर्लेकर , प्राचार्य प्रदिप पाटील , उपप्राचार्य किरण कोळी , पर्यवेक्षक पी.बी.पाटील , अदिलशहा फकीर , दादा पाटील , सचिन पाटील , अँड.अक्षय भोसले , महेश भोपळे , विजय पाटील , नंदकिशोर पाटील, सूरज पाटील , अशोक चव्हाण , आप्पासाहेब पाटील, शकर खोत , पोपट सुतार , राजेंद्र खंदारे , अल्लाबक्ष शेख,  मनोज शिंगे ,पवन पवार ,रंगराव पवार,सुरज चव्हाण इत्यादी मोठ्या संख्येने  यादव आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.                                                                                                                        संकलन – मोहन शिंदे.

anews Banner

Leave A Comment