Home रत्नागिरी आविष्कार संस्थेमध्ये गणेशोत्सव साजरा

आविष्कार संस्थेमध्ये गणेशोत्सव साजरा

177

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0028.jpg

आविष्कार संस्थेमध्ये गणेशोत्सव साजरा

रत्नागिरी,(सुनील धावडे)- दरवर्षी प्रमाणे आविष्कार संस्थेमध्ये सौ. सविता कामत विद्यामंदिर व शामराव भिडे कार्यशाळा यांचा एकत्रित गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी कार्यशाळेतील दीप्तेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांकडून लगद्यापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्यात आली. वर्गावर्गातील तयार केलेल्या गणपतीच्या कलाकृतींचे तसेच विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

इंद्रधनुष्याच्या रंगांच्या पताका लावून सजावट करण्यात आली होती. गणेश मूर्तीची शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती करण्यात आली. ज्ञानेश्वर वांडकर सभागृहात शाळा व कार्यशाळा एकत्रित विद्यार्थी तसेच कर्मचारी यांनी भजन सादर केले.

शुक्रवारी सकाळी आरती झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी गौरीचे खेळ खेळले. गाणी गायली व जाखडी नृत्य सादर केले. दुपारी अतुलित बलधाम उपासक यांच्या तर्फे भजन सादर करण्यात आले. गणेश मूर्तीची मिरवणूक काढून शाळेच्या पाठी गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

Previous articleलांझेळा येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा।
Next articleगोगटे- जोगळेकरच्या स्वरूप आणि प्रियांकाला संस्कृतविषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार प्राप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.