Home भंडारा वर्धा व अमरावती जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले बौद्ध अनुयायांना मोलाचे...

वर्धा व अमरावती जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले बौद्ध अनुयायांना मोलाचे मार्गदर्शन

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240227_071839.jpg

वर्धा व अमरावती जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर
यांनी केले बौद्ध अनुयायांना मोलाचे मार्गदर्शन

संजीव भांबोरे
शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ व २५ फेब्रुवारी २०२४ हे दोन दिवशी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ‘येनाडा’ गावानजीक भव्य अशा माळरानावर पू. भ. डॉ. सत्यानंद महाथेरो यांनी उभारलेल्या महा विहाराच्या भव्य प्रांगणावर आजूबाजूच्या हजारो बौद्ध उपासिका व उपासकांच्या व पू. भ. प्राचार्य सुमेधबोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या महापरित्राण पाठाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रित केले होते. ‘आज देशाला नव्हे जगाला बुद्धाशिवाय तरणोपाय राहिला नाही’ असे यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले . त्यानंतर अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर आयोजित जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित समूहाला संबंधित केले. या पवित्र आणि जागतिक धम्म मंचावर संयोजकांच्या आग्रहाखातर मला, ‘समेध बोधीसत्व बुद्धीची साथ होती। सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती।’ हे गीत गाण्याची संधी मिळाली. श्रीपती ढोले यांना मिळाली .दि. २५ फेब्रुवारी २०२४ ची पहिली सभा ही अचलपूर-परतवाडा या जोड गावाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य सभागृहात माता ‘रमाई जयंती’ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सुद्धा श्रीपती ढोले यांनी ‘रमाई’ गीत सादर केले. त्यानंतर ‘पांढरी’ या गावी बौद्धांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला त्या गावी आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली. आनंदराज यांना पाहून सर्व बौद्ध वाडा अतिशय भावूक झाला होता. केवळ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान गावाच्या प्रवेशद्वारावर उभारली जावी’ या मागणीसाठी तेथील बौद्धांना जंगजंग पच्छाडले जात आहे. “आमच्या शरिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहे” याचा पुरावा म्हणून दहा-अकरा वर्षाच्या दोन बालकांनी स्वत:च्या हातावर ब्लेड ने वार केल्याच्या जखमा जेव्हा त्या बालकांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना दाखविल्या तेव्हा संपूर्ण जमावाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. “मी मुंबईला पोहचल्यानंतर स्वत: गृह मंत्र्याला भेटून तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कामाला हात लावणार नाही” हे साहेबांनी आश्वासन दिले आणि त्यामुळे सर्वच गावकऱ्यांना आणखीच गहिवरून आले. पांढरी गावच्या समता सैनिक दलाच्या रणरागिणी जणू शत्रूशी दोन हात करण्यासाठी साहेबांना परवानगी मागत आहेत अशा पवित्र्यात अगदी शिस्तीत व आदेशाबरहुकुम हालचाली करीत होत्या. साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाला जातीय रंग चढवण्याची विरोधकांना संधी मिळू देऊ नका. जो नासका कांदा आहे त्याच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करा. त्याची मस्ती जीरवण्याचे काम मी करतो. एसपी, बीडीओ, कलेक्टर यांना माझे कार्यकर्ते भेटून त्या नराधमावर ऍट्रॉसिटी दाखल करण्यास भाग पाडतील याबाबत तुम्ही निश्चिंत राहा.” हे मार्गदर्शन साहेबांनी पांढरीकरांना केले त्यानंतर त्यांच्या ताफा अंजनगाव सुर्जीकडे रवाना झाला. अंजनगाव सुर्जीची सभा अतिशय जोशात पार पडली. यावेळी अमरावती जिल्ह्याचे महासचिव ऍड. धर्मेंद्र आठवले यांच्या कल्पनेतून बाहेर पडलेल्या “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार। बनवूया अमरावतीचे खासदार।” या घोषणेचा उपस्थित समुदायाने वारंवार पुनरुच्चार केला आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना अमरावतीचे खासदार बनविण्याचा जाहीर निर्धार केला. त्यानंतर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले. नेहमीप्रमाणे सरसेनानी आनंदराज आंबेडकर दौऱ्यादरम्यान सर्व बारीक सारीक गोष्टींवर लक्ष होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन म्हणून नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणून मी स्वतः आजी माजी विद्यार्थ्यांना संघटित करीत आहे. माझ्या नागसेन हायस्कूल व नागसेन प्रायमरी स्कूल च्या आजी माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझा माजी विद्यार्थी प्रबुद्ध सरकटे यांना मी सोबत घेऊन गेलो होतो. रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश महासचिव प्रा. सतीश सियाले सर हे सुद्धा औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. जुन्या पिढीचे व नव्या पिढीचू पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी व विद्यमान ऑनरेबल चेअरमन यांच्याबरोबर मी जाणीवपूर्वक फोटो घेतला. उद्देश हा आहे की, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी विद्यमान ऑनरेबल चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स एज्युकेशन सोसायटीला उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विनायकराव दुधे सरांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल बरडे व अमरावती शहराध्यक्ष किशोर पानेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व कार्यकर्ते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना अमरावतीचे खासदार करण्यासाठी तनमनधनाने प्रयत्न करीत आहेत.

Previous articleआजचा विद्यार्थी भरकटतोय
Next articleखा. गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिनेस क्लब,श्रीरामपूर यांच्या वतीने लोयोला चर्चला बेंचेस भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here