Home नांदेड येवती येथे शेतकऱ्यांचा पारंपारिक बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.

येवती येथे शेतकऱ्यांचा पारंपारिक बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.

158

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0009.jpg

येवती येथे शेतकऱ्यांचा पारंपारिक बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-
भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जगाचा पोशिंदा हा शेतकरी असतो अन् शेतकऱ्यांच्या शेतीत राबराब राबणाऱ्या बैल राजा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शेतकरी राजाकडून बैल पोळा सण साजरा केला जातो.पोळयाच्या आदल्या दिवशी म्हणजेच खांडमळया रोजी बैलांना स्वच्छ स्नान घालून त्यांना नैवेद्य देवुन उद्याचे औतन दिले जाते. मग पोळ्या रोजी बैलांना साज घालून रंग रंगोटी केली जाते व सर्व शेतकरी व गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती वाजत गाजत बैलांची मिरवणूक काडीत हनुमान मंदिरांना प्रदक्षिणा घातली जाते.
हा सण २६ ऑगस्ट २०२२ रोजी
मुखेडच्या येवती येथे मानकरी पद्माकर सुभाषराव पाटील यांच्या वतीने गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती बैल पोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे . यावेळी शेतकरी, व गावातील प्रमुख मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Previous articleभाजपात जल्लोषाचे वातावरण रत्नागिरीत स्वागताचे बॅनर्स झळकले अनेक प्रलंबित विकासकामांसाठी मागण्या करणार
Next articleभोकरच्या लामकानीत बैलपोळा उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.