Home नांदेड पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

122

राजेंद्र पाटील राऊत

पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर, नांदेड : पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आपले कर्तव्य बजावित असतात. दिवाळी, होळी, ईद, राजकीय नेते , हत्या , भांडण, अपघात, मतदान प्रक्रिया, चोरी, मारामारी, आदी अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या अशा : पोलिसांना सुंदर कॉर्टर बनवून देणे, पोलिसांना टी. ए. वाढवून देणे, पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी ड्युटीवर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांच्या वारसाला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्ववत करणे, महाराष्ट्रातील पोलीस ठाणेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Previous articleबेटमोगरा येथे चैत्र बारस निमित्त यात्रेस प्रारंभ भव्य कावड मिरवणुक व जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन.
Next articleनांदेडच्या महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांची सदिच्छा भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.