Home नांदेड बेटमोगरा येथे चैत्र बारस निमित्त यात्रेस प्रारंभ भव्य कावड मिरवणुक व जंगी...

बेटमोगरा येथे चैत्र बारस निमित्त यात्रेस प्रारंभ भव्य कावड मिरवणुक व जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन.

87
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220412-WA0070.jpg

बेटमोगरा येथे चैत्र बारस निमित्त यात्रेस प्रारंभ

भव्य कावड मिरवणुक व जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले शिवलिंग बादशाह मठ संस्थान बेटमोगरा येथे राष्ट्रसंत सदगुरु १०८ ष.ब्र डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरनेने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र बारस निमित्त यात्रेस सुरुवात झाली असून दि.१३ एप्रिल बुधवार रोजी रात्री ११ वाजता भव्य कावड मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठधिपती सदगुरू डॉ. सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी दिली.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती.मात्र दोन वर्षांनंतर कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमांच्या बंधनामध्ये शिथिलता देण्यात आली.या कारणाने यावर्षी मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे भव्य कावड मिरवणूक सह दि.१४ रोज गुरुवार रोजी दुपारी जंगी कुसत्यांच्या सामणे रंगणार आहे. तसेच चैत्र बारस निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले असुन दि. १० एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी किर्तनकार श्री.अनिल स्वामी शेवाळ व दि.११ एप्रिल रोजी श्री.सखाराम सोनटक्के पाखंडेवाडी यांचे किर्तन झाले असून दि.१२ रोजी सौ.सुनीता दत्तात्रय शिंगनवाड चांडोळकर दि.१३ एप्रिल रोजी श्री.संगमेश्वर बिरादार वलांडी दि.१४ एप्रिल रोजी श्री.कैलास जामकर डोंगरगाव यांचे किर्तन होणार आहे.तसेच दि.१५ एप्रिल रोजी श्री.तानाजी पाटील थोटवाडीकर यांचे प्रसाद वरील किर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचे पंचक्रोशीतील नागरिकांनी व यात्रेकरूंनी लाभ घेऊन आपले जिवन सार्थकी लावावे असे अवाहन शिवलिंग बादशाह मठसंस्थानचे मठाधिपती सदगुरु डॉ. सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी केले.

Previous articleपालघरला जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न       
Next articleपोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here