Home नांदेड दैनिक चालू वार्ता पेपरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर येथे विविध शाळेमध्ये वृक्षारोपण...

दैनिक चालू वार्ता पेपरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर येथे विविध शाळेमध्ये वृक्षारोपण व ध्वज वाटपाचा कार्यक्रम.

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0060.jpg

दैनिक चालू वार्ता पेपरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर येथे विविध शाळेमध्ये वृक्षारोपण व ध्वज वाटपाचा कार्यक्रम.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर: आज दिनांक 28 जुलै रोजी दैनिक चालू वार्ता पेपरचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त देगलूर शहरांमध्ये विविध शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ध्वज व वृक्षारोपणाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते दैनिक हे कार्यक्रम देगलूर शहरातील ज्ञान सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल व संस्कृती इंग्लिश स्कूल देगलूर या दोन शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकाने दैनिक चालू वार्ता च्या या उपक्रमाला खूप सहकार्य केलं .या कार्यक्रमाला देगलूर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री परगेवार सर व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री विशाल पवार सर तसेच मार्गी चे सरपंच संतोष पाटील देगलूर शिवसेना धनंजय जोशी सर ईश्वर देशमुख बाळकडू वृत्तपत्राचे देगलूर प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार पत्रकार देगलूर वैजनाथ स्वामी सामाजिक कार्यकर्ते दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी माणिक सूर्यवंशी त्यावेळी उपस्थित होते दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे सरांनी दैनिक चालू वार्ता बद्दल सर्व शाळेतील मुलांना दैनिक चालू पेपर बद्दल माहिती दिली .चालु वार्ता या सद्यस्थितीत अव्वल दर्जाचे, लोकप्रिय दैनिक म्हनुन अल्पावधीतच नाव कमाविले.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील संपादकापैकी आपल्या सर्व प्रतिनिधिंशी व्यक्तीश संपर्क साधून एकजुट करनारे मुख्य संपादक सन्मा. डि.एस.लोखंडे पाटील, कार्यकारी प्रबंधक रोशनी वर्या मॅडम,‌दैनिक चालु वार्ता चे सर्व कार्यकारी मंडळ तथा सर्व प्रतिनिधि,यांच्या अथक प्रयत्नाने आज दै. चालु वार्ता ची यशस्वी वाटचाल चालु आहे.
दै. चालु वार्ता च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व क्षेत्रातून शुभेच्छा चा वर्षाव देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here