⭕कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाच्या हद्दीतील २५ रुग्ण कोरोनामुक्त !⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाचे हद्दीत सिंहगड कॉलेज होस्टेल कोंढवा बुद्रुक येथील विलगीकरण कक्षातून आज एकूण २५ कोरोनाबाधित रुग्णांना माझ्या उपस्थितीत रुगणांना डिस्चार्ज कार्ड, गुलाब, मास्क, सॅनिटायझर देऊन डिस्चार्ज देण्यात आला. तसेच यापुढे स्वतःच्या घरीच विलगीकरणात राहून स्वत:ची आवश्यक काळजी घेणेबाबत मी विनंती केली.
यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा मनिषाताई कदम, माजी आमदार योगेशजी टिळेकर, नगरसेविका वृषालीताई कामठे, संगीताताई ठोसर, नगरसेवक विरसेन जगताप, सह.महा.आयुक्त सुरेश जगताप, सहाय्यक आयुक्त रविंद्र घोरपडे, नोडल ऑफिसर राजेंद्र थोरात, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. बेंडे, इन्चार्ज डॉ.दिप्ती बच्छाव, डॉ.लाटणे, डॉ.निलेश भोसले, डॉ.सुनिल आंधळे, डॉ.मिलिंद खेडकर, डॉ.अरविंद मकर, डॉ. स्नेहल गोल्हार व अन्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.
तसेच सर्व रुग्णांनी विलिनीकरण कक्षातील वैद्यकीय व अन्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले त्याबद्दल तेथील सर्व डॉक्टर व सेवेतील कर्मचाऱ्यांचे समस्त पुणेकरांकडून मनःपूर्वक आभार..!
