Home Breaking News धक्कादायक” आज नांदेड मध्ये आणखी एकाचा मृत्यू ; जिल्ह्यात आज ६ रुग्ण...

धक्कादायक” आज नांदेड मध्ये आणखी एकाचा मृत्यू ; जिल्ह्यात आज ६ रुग्ण वाढले तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७ वर*

140
0

*धक्कादायक” आज नांदेड मध्ये आणखी एकाचा मृत्यू ; जिल्ह्यात आज ६ रुग्ण वाढले तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७ वर*
*नांदेड,दि २५ ; राजेश एन भांगे*
नांदेड जिल्ह्यातील सोमवार दिनांक 25 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 96 हवाला पैकी 84 निगेटिव अहवाल प्राप्त झाले व नवीन 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्ह्याची संख्या 133 झाली आहे.

☑️ आज दिवसभरात एकाचा मृत्यू
डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील एका 55 वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण हा मिल्लत नगर भागातील असून त्याचा मृत्यु झाला आहे.

आता प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्ण खालील भागातील आहेत.
☑️ इतवारा भागातील दोन रुग्ण
(लिंग -पुरुष अनुक्रमे वय वर्ष 27, 32)
☑️आनंद कॉलनी जिजामाता कॉलनी येथील एक रुग्ण
लिंग -पुरुष वय वर्ष 80)
☑️ मिल्लत नगर येथील एक रुग्ण
(लिंग -पुरुष वय वर्ष 55)
☑️वडसा तालुका माहूर येथील एक रुग्ण
(लिंग – पुरुष वर्ष 17)
☑️ व दहेली तांडा किनवट तालुक्यातील एक रुग्ण
(वय वर्ष – 29)

वरील सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तसेच सोमवार दिनांक 25 मे 2020 रोजी एनआरआय यात्रीनिवास कॉवीड सेंटर येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार सध्या जिल्ह्यात 133 पॉझिटिव रुग्णांपैकी 63 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 64 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्यातील आणखी एका 55 वर्षीय स्त्री रुग्णाची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याचे नांदेड आरोग्य विभागाच्या पत्रकात नमूद केले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 6 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️आज दिवस भरात 4 रुग्णांना सुट्टी
☑️ एकूण रुग्ण संख्या 133वर.
☑️ आतापर्यंत 63 रुग्ण बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️7 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️63 रुग्णांवर उपचार सुरू.

दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सदर माहिती २५ मे रोजी सायं ५ वा प्राप्त.

Previous article
Next articleकोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालायाच्या हद्दीतील २५ रुग्ण कोरोनामुक्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here