Home सोलापूर पंढरपुरात मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामास सुरुवात

पंढरपुरात मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामास सुरुवात

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_183118.jpg

पंढरपुरात मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामास सुरुवात

सोलापूर जिल्हा बिरो चिप्फ ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागणीस यशमुस्लिम बांधवाना जिल्हाध्यक्ष समीर तांबोळी यांनी केली आवाहनपंढरपूर – अल्पसंख्यांक बहुल क्षेञ विकास योजने अंतर्गत12 लाख62हजार रुपयांच्या निधीतून पंढरपुरातील बडा कब्रस्तान व गोपाळपूर येथील लिगायत स्मशानभूमी शेजारील कब्रस्तानातील 9लाख रुपयांच्या विकास कामास सुरुवात करण्यात आलेली आहे याचे उद्घघाटन शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्धघाटना वेळी अध्यक्ष मुबारक अवतार, शहराध्यक्ष आदम बागवान.पञकार रफिक आतार,मिन जानीब कमिटीचे अध्यक्ष शफी मुलाणी व ईतर मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.गेल्या 6 वर्षापासून शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या माध्यमातून समाजातील धार्मिक स्थळातील प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन,उपोषण करून पाठपुरावा करत पंढरपूर नगरपरिषदेचे व प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेतले त्यानंतर बडा कब्रस्तान येथे 5 लाख व छोटा कब्रस्तान 5 लाख असे पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या फडातून ऐकून 10लाख रूपयांचे काम केले.बडा कब्रस्तान येथे हाय मास्ट दिवा व गेट बनविण्यात आले असून सध्या बडा कब्रस्तान येथे अंत्यविधीचे सामान टेवणयाचे12लाख 62 हजार रुपयांच्या अल्पसंख्याक निधीतून आर सी खोली बांधण्याचे सूरू आहे.तसेच या ठिकाणी मनसे दिलीपबापू धोञे यांनी स्वखर्चातून काँक्रिटीकरण केलेले आहे व पंढरपूर नगरपरिषद शाळा क्र 16 व17 या ठिकाणी पायाभूत सुविधा योजनेतून छत दुरुस्तीसाठी 2+2असे 4लाख रूपयांचे शासनाच्या निधीतून काम झालेले आहे.. पंढरपूर शहरातील सांगोला रोड येथील छोटा कब्रस्तानची 10 गुंठे जागा रस्ता रुंदीकरणात जाणार म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने त्याबाबत नगरपरिषदविरोधात पंढरपूर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या बदलत्या नगरपरिषदेकडून गोपाळपूर रोड येते 33 गुंडे शेगाव दुमाल हद्दीत55 गुंठे जागा देण्यात यावी असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला. त्यानंतर गोपाळपूर रोड येथे 33 गुंठे देण्यात आले.पण 55 गुंठ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे सदरची जागा ताब्यात देऊन त्या ठिकाणी संरक्षण वॉल कंपाऊंड, हायमास्ट.दिवा, कॉकीटीकरण करून सुरक्षा रक्षक देण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर व पंढरपूर नगरपरिषद प्रशासक तथा प्रांत यांना निवेदन घेऊन पाठपुरावा सुरू आहे तसेच पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना निधी देण्यासाठी समाजातील मतभेद मिटवण्यासाठी वक्तव्य बोर्डेचे मा.चे अरमन वसाहत मिर्झा यांना निवेदन देऊन शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर तांबोळी यांनी पंढरपूर शहरात यावे अशी मागणी केली आहे. तसेच शासनाच्या जी आरनुसार मुर्शिदबाबा दर्गा व बडा कब्रस्तान या ठिकाणाच्या7/12 उताऱ्यावरील ट्रस्टचे नावे कमी केलेले आहेत तरी मुस्लिम समाजातील तांबोळी;आतार,शेख बागवान,खाटीक व इतर सर्व जमातीच्या प्रमुख व्यक्ती यांची एक कमिटी स्थापना करून बडा कब्रस्तान, मुर्शिदबाबा दर्गा व 55 गुंठे क्षेत्रासाठी नवीन ट्रस्ट नेमण्यासाठी समाजातील सर्वांची मीटिंग घेण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी विकास कामे करता येतील समाजातील एकमेकांशी आपसात मतभेद न करता समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच शासन वारंवार निधी देऊ शकत नाही त्यामुळे नीती अभावी कामे बंद पडू नये याकरिता कब्रस्तानासाठी मुस्लिम समाजातील सर्व जमातीच्या प्रमुख लोकांनी आपापल्या समाज बांधवांच्या पावत्या फाडून निधी गोळा करून कब्रस्तानासाठी खर्च करण्यात यावा व शिलक निधी बँकेच्या खात्यावर ठेवावा जेणेकरून पुन्हा विकासकामासाठी निधी कमी पडणार नाही तरी निधी गोळा करावा व आहे त्या छोटा बडा कब्रस्तानातील मयत करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने नवीन कब्रस्तान उभारण्यासाठी नवीन जागा घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच मुर्शिद बाबा दर्गा व बडा कब्रस्तान या जागेवर सर्व मुस्लिम बांधव यांच्या अधिकार असताना वक्फ बोर्ड यांचे नियंत्रणाखाली असताना सर्व जमातीचे लोकांनी मीटिंग घेऊन त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी चेंजिंग रिपोर्ट सादर करू नये असे आवाहन शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे अध्यक्ष समीर तांबोळी यांनी केले.

Previous articleपरळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला
Next articleसचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन …
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here