Home जळगाव खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी म्हणून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी म्हणून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_074637.jpg

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी म्हणून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मौजे बोढरे शिवापूर वादग्रस्त जेबीएम सोलर कंपनीच्या जमिन खरेदी व्यवहारातील जमिनीच्या मोबदल्याची मागणी केल्यावरून मौजे बोढरे येथील शेतकरी महिलेचा खुन केल्याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होवून अद्याप पावेतो एकाही आरोपीला अटक झाली नाही.
या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी फिर्यादी मदन उत्तम राठोड व पीडित कुटुंबकर्ता देविदास पवार हे 3 दिवसापासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
मौजे बोढरे शिवारात मयत शेतकरी महिला हिची पतीच्या नावे असलेल्या 17 एकर जमिनेचे फक्त 11 लाख रूपये मोबदला देऊन
एजंटामार्फत जेबीएम सोलर कंपनीने जमिन स्वस्तात खरेदी करून घेतल्यानंतर पती च्या बँक खात्यात टाकण्यात आलेले 11 लाख रूपये मधून चेकद्वारे आरोपींनी लाख रूपये काढून घेतले होते.
काढलेले पैसे व जमिनीच्या पुरेपूर मोबदल्याची मागणी मयत महिला आरोपींकडे करीत असतांना आरोपींकडून मयत महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती धमकी मिळाल्यानंतर अवघ्या चार दिवसात महिलेचा संशयास्पद मृत्यु झाला होता.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गु.र.नं.387/2023 अन्वये 27/10/2023 रोजी 9 आरोपींसह इतर 4 अनोळखी व्यक्तींवर खुनाचा गुन्हा करण्यात आला होता. त्यात अद्याप एकही आरोपी अटकेत नसल्याचे फिर्यादी मदन उत्तम राठोड व पीडित कुटुंबकर्ता देविदास पवार यांचे म्हणणे आहे.
सदर आरोपीकडून फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. तसेच सोलर प्रकल्प पिडीत शेतकर्यांच्या न्यायासाठी लढत असलेले बोढरे गावचे राहीवाशी फिर्यादीचे मित्र भिमराव जाधव हे फिर्यादीला मदत करताहेत म्हणून त्यांनाही अज्ञात गुंडांकडून जिवे ठार मारण्याची धमकी धमकी दिली आहे.
याबाबत पोलिसात फिर्यादही दिली आहे.आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून गावात व आजूबाजूच्या परिसरात मोकाट फिरत असतांना देखील अद्याप पर्यंत एकाही आरोपीला अटक होत नसल्याने उपोषणाला बसावे लागत असल्याचे फिर्यादी मदन उत्तम राठोड व पीडित कुटुंबकर्ता देविदास पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here