Home नांदेड कवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

कवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0052.jpg

कवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

नायगाव – मोफत बियाणे,खते,व चारा डेपो तात्काळ देण्याचे निवेदन आज नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले
सध्याची दुष्काळजन्य परीस्थीती पाहता नायगांव मतदार संघातील नायगांव उमरी, धर्माबाद या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, खते व पिण्याचे पाणी तसेच जनावारांसाठी चारा डेपो तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाही खरीपाची पहीली पेरणी अल्पपावसामुळे वाया गेली आहे दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासनाकडुन मोफत बियाणे, खते व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देवुन जनावारांसाठी ठीकठीकाणी चारा डेपो तात्काळ उभारण्यात यावे. खरीपाच्या पहील्या पेरणीचा खर्च वाया गेल्यामुळे मतदारसंघातील शेतकरी अगोदरच अर्थीक अडचणीत आहे.
त्यामुळे उपरोक्त मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली

Previous articleभगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत
Next articleव-हाणे प्रकरणात राजेंद्र पाटील राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here