Home बीड परळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला

परळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला

125

आशाताई बच्छाव

IMG_20240404_182736.jpg

परळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०४ परळी शहरात फळ विक्रेते शरीराला घातक असे रसायन सर्रास वापरत असून, प्रेस्टिसाइड नावाच्या केमिकल मुळे कर्करोग होतो. आत्तापर्यंत कधीच फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली नाही. परळी शहरातच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात रसायनयुक्त फळे फळविक्रेत्यांकडून विकले जात आहेत. परळी शहरात तर फळ विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा केमिकल असलेल्या फळामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण शहरात वाढत आहेत. त्यामुळे शहरातील दवाखान्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. फळ लवकर पिकावे म्हणून फळ विक्रेत्यांचा केमिकल चा येथेच्छ वापर होत आहे. स्वतःची आमदनी वाढवण्यासाठी फळ विक्रेत्यांकडून जनतेच्या आरोग्याशी, जिवाशी खेळले जात आहे. तसेच केज शहरातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर बालासाहेब आस्वले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की फळ लवकर पिकावे व जास्त दिवस टिकण्यासाठी काही केमिकल चा वापर फळ विक्रेत्याकडून केला जातो त्यात प्रेस्टिसाइड या केमिकलचा वापर केला जातो. ज्यामुळे कर्क (कॅन्सर) रोगासारखा गंभीर आजार होऊ शकतात. उदाहरणार्थ: केळी घेताना केळी पिवळी दिसते पण केमिकल मध्ये पिकवल्याने त्याचे देठ हे हिरवेच असते. दोन दिवसात संपूर्ण केळी काळी पडते. असेच आता आंब्याचा सिझन चालू होईल यात ग्राहकाला सांगितलं जात की, आंबा हा एसी मध्ये पिकवला जातो पण ग्राहक कधीच त्या गोडाऊन पर्यंत जाऊन पहात नाही की तो कशात पिकवला जातो तो पण केमिकल मध्येच पिकवतात. वरवर जरी आंबा पिकलेला वाटत असेल तर आत मध्ये पांढरा व आंबट असतो. तरी जनतेने फळ विकत घेते वेळेस शहानिशा करूनच फळे विकत घ्यावीत व आत्तापर्यंत या फळ विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई होत नाही त्यामुळे यांचा निरडपणा वाढला आहे. तरी येथून पुढे फळ विक्रेत्यांचे लायसन तपासून केमिकल युक्त आरोग्यास धोकादायक फळ विक्रेत्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनाकडून होत आहे.

Previous articleशोक संदेश युवा मराठा न्यूजचे सुनील गांगुर्डे यांना मातृशोक
Next articleपंढरपुरात मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामास सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.