Home जळगाव चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त : तरुणा विरोधात गुन्हा

चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त : तरुणा विरोधात गुन्हा

126
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0036.jpg

चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त : तरुणा विरोधात गुन्हा

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

चाळीसगाव : अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो चाळीसगाव पोलिसांनी खरजई रोडवरील रेल्वे गेटजवळ ताब्यात घेत 18 लाख 32 हजार 904 रुपये किमतीचा गुटखा जप्त केल्याने शहरातील गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवार, 14 जून रोजी करण्यात आल्या नंतर शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गुलाब कोतकर (24 गुरुवर्य नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
जमावाने फोडल्या वाहनाच्या काचा खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप (एम.एच. 19 सी.एक्स.0083) मध्ये गुटखा येत असल्याचा संशय नागरीकांना आल्यानंतर बुधवारी नागरीकांनी वाहन अडवल्यानंतर त्यातील गुटखा पाहून जमावाने वाहनाच्या काचा फोडत वाहनातील चालक अक्षय गुलाब कोतकर यास चोप दिला होता, तर चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत पिकअप पोलीस ठाण्यात आणत अन्न व औषध प्रशासनाला सूचित केले मात्र पथक न आल्याने अखेर पोलिसांनीच या प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस शिपाई अमोल युवराज भोसले यांच्या फिर्यादी वरून गाडी चालक अक्षय गुलाब कोतकर (24, चाळीसगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशय न येण्यासाठी कॅबीनवर शेतीमालाच्या
जाळ्या संशयित कोतकर याने वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याचा संशय येवू न यासाठी वाहनाच्या कॅबीनवर शेती मालाच्या जाळ्या ठेवल्या मात्र सुज्ञ नागरकांनी संशयिताला हेरत चोपले व पोलिसांना माहिती कळवली. दरम्यान, या वाहनातून राज्यात प्रतिबंधीत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून सात लाख रुपयांची बोलेरोदेखील जप्त करण्यात आली. या कारवाईने गुटखा माफियां मध्ये खळबळ उडाली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

Previous articleयेणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : शेतकरी कामगार पक्ष
Next articleअवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here