Home जळगाव अवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल

अवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0035.jpg

अवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासना मार्फत धडक कारवाई करण्यात येत असून आठवडा भरात सुमारे 25 हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी दंड न भरल्यास संबंधिताच्या मालमत्तांवर बोजे बसवण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परीषदेत दिली.
वाळू वाहतुकीवर लावणार अंकुश. …
ते म्हणाले की, गत आठवड्यात महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यावर वाळू माफियांनी रावेर तालुक्यात हल्ला केला होता. यापुढे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच वाळू माफियांवर अंकुश लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील तसेच वाळू माफियांच्या वाहनांसह जप्तीसह त्यांच्या मालमत्तावर आता बोजा चढवला जाणार आहे. वाहन भाडे तत्वावर असलेतरी मूळ मालकावरही कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
27 रोजी मुख्यमंत्री येणार
जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवार, 27 रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. या कार्यक्रमात लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थींची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाला किमान 70 ते 75 हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here