Home महाराष्ट्र विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक, विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुखांचा...

विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक, विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुखांचा विरोध !

122
0

⭕ विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक, विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुखांचा विरोध !⭕
मुंबई :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : देशांतर्गत विमान वाहतूक २५ मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असं असलं तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. मध्यरात्री ट्वीट करत त्यांनी विमानसेवा सुरु करणं धोक्याचं असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.’

ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असं देखील अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

देशांतर्गत विमान वाहतूक उद्या, २५ मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. . आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरु करण्याचा प्रयत्न करू असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं आहे.

२५ मार्चपासून देशातली विमान वाहतूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला सरकार देशांतर्गत वाहतूक 33 टक्के क्षमतेनं पूर्वपदावर आणणार आहे. त्यासाठी विशेष नियमावलीही सरकारनं जाहीर केलेली आहे. देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारचं वंदे भारत मिशन सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.

देशांतर्गत विमान वाहतूक येत्या २५ मेपासून सुरु होणार, हवाई वाहतूकमंत्र्यांची माहिती

त्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीप पुरी म्हणालेत, “ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आधी आम्ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करू शकू असा विश्वास मला वाटतोय, जरी पूर्ण क्षमतेनं ही वाहतूक तोपर्यंत सुरु होऊ शकली नाही, तरी किमान काही ठराविक टक्के क्षमतेनं तरी ती सुरु करू”. जगातल्या अनेक राष्ट्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा काही काळ बंद ठेवली आहे.

यापूर्वी देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक येत्या २५ मेपासून सुरु होणार असून त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत.

Previous articleवृत्तपत्राने छापली ‘कोरोनामुळे मृत पावलेल्यांची यादी,ट्रम्प सरकारला चपराक
Next articleकारोनाग्रस्त नर्सचा फोटो व्हायरल; कुटुंबाला मनस्ताप!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here