• Home
  • वृत्तपत्राने छापली ‘कोरोनामुळे मृत पावलेल्यांची यादी,ट्रम्प सरकारला चपराक

वृत्तपत्राने छापली ‘कोरोनामुळे मृत पावलेल्यांची यादी,ट्रम्प सरकारला चपराक

 

⭕वृत्तपत्राने छापली ‘कोरोनामुळे मृत पावलेल्यांची यादी,ट्रम्प सरकारला चपराक⭕
नवी दिल्ली 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये कोरोना मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे ट्रम्प सरकारचे अपयश जगासमोर आले आहे. यात द न्यू यॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या आजच्या बातमीने ट्रम्प सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये ‘अमेरिकेत १ लाख मृत्यू आणि न मोजता येणारी हानी’ या मथळ्याखाली बातमी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे देण्यात आली आहे. द न्यूयॉर्क टाईम्सचे आजचे वृत्त जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.

कोरोनामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा १ लाखाच्या घरात गेला आहे. चीनमधून सुरु झालेला कोरोना आशिया आणि युरोपच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. आफ्रीका आणि नॉर्थ अमेरिकेतही कोरोनाचे हॉटस्पॉट तयार झाले आहेत.

अमेरिकेत १.६ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा हा १ लाखाच्या घरात गेल्याचे द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

कोरोनाचा नवा रुग्ण न आढळल्याची माहिती शनिवारी चीननं दिली. दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात भीषण परिस्थिती ओढवली आहे. कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच आपल्या सहकार्यांसहित वर्जिनियातील गोल्फ क्लबला भेट दिली.

कोरोनामुळे देशातील उद्योग आणि सामाजिक गतीविधी बंद झाल्यानंरची ही पहिली भेट होती. यावेळी त्यांनी चर्च आणि इतर कामाची ठिकाणं सुरु करण्याचे आवाहन केले.

ट्रम्प यांच्या काही आरोग्य सल्लागारांनी देखील हे सुरु करण्यास हिरवा कंदील दिला. त्याला आठवडाभरासाठी कामावरुन काढून टाकण्यात आले.

anews Banner

Leave A Comment