• Home
  • जिओचा बेस्ट प्लान, ३४९ रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉल 🛑

जिओचा बेस्ट प्लान, ३४९ रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉल 🛑

🛑 जिओचा बेस्ट प्लान, ३४९ रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉल 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 जुलै : ⭕ रिलायन्स जिओकडे ३ प्लान आहेत जे रोज ३ जीबी डेटा ऑफर करतात. हे रिचार्ज पॅक डेटा ऑफर करतात. ज्या लोकांना जास्त डेटाची गरज आहे. त्यांच्यासाठी हे खास प्लान जिओने आणले आहेत. वर्क फ्रॉम होम करताना डेटाची जास्त गरज भासते अशा वेळी युजर्संना रोज ३ जीबी डेटा देणारे प्लान मस्त आहेत. या प्लानमध्ये डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधा सुद्धा दिली जाते.

जिओचा ३४९ रुपयांचा रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या रिचार्ज प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. म्हणजेच युजर्संना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. दररोज मिळणाऱ्या डेटाच्या मर्यादा संपल्यानंतर 64Kbps च्या स्पीडने डेटा खर्च केला जावू शकतो.

जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉल केली जावू शकते. जिओ वरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १ हजार मिनिट्स दिले जातात. ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री दिले जातात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जातात.

जिओकडे आणखी दोन प्लान आहेत. ज्यात ३ जीबी डेटा मिळतो. ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तसेच ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता २५२ दिवसांची आहे. ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा अतिरिक्त डेटा या हिशोबाप्रमाणे ९० जीबी डेटा दिला जातो. ९९९ रुपयांच्या पॅकमध्ये २५२ जीबी डेटा मिळतो. ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टाहरचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या पॅकमध्ये मिळणारे सर्व फायदे हे ३४९ रुपयांचे आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment