Home Breaking News लोकल प्रवासासाठी ई-पास लागणार; जाणून घ्या कसा मिळवाल ई-पास 🛑

लोकल प्रवासासाठी ई-पास लागणार; जाणून घ्या कसा मिळवाल ई-पास 🛑

78
0

🛑 लोकल प्रवासासाठी ई-पास लागणार; जाणून घ्या कसा मिळवाल ई-पास 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 जुलै : ⭕ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये – जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) असल्यास लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी. ३० जुलैपासून हा नवीन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं संबंधित कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यालयातून ई- पास मिळविण्यासाठी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्य सचिव संजय कुमार यांनी केले आहे.

उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयातील कार्यालय प्रमुखाकडे ई-पाससाठी अर्ज करावा लागेल. या अर्जात कर्मचा-यांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असेल, ज्यामध्ये त्याचे नाव, पद, विभाग, राहण्याचे व कामाचे ठिकाण, मोबाईल नंबर यासह इतर बाबींची नोंद आवश्यक असेल.

हा अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडून राज्य सरकारच्या नोडल अधिकारी यांच्याकडे सॉफ्ट व हार्ड कॉपीद्वारे देणे अनिवार्य आहे. संबंधित नोडल अधिकारी यांना हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राहतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मंजूर अर्जाच्या कर्मचाऱ्याला याबाबत एसएमएस लिंक पाठवली जाईल. त्या लिंकद्वारे संबधित कर्मचाऱ्यांना एक फॉर्म मोबाईलद्वारे पाठवावा लागेल. यासाठी असणाऱ्या सर्व सूचना पाठविलेल्या लिंकवर उपलब्ध राहतील. याबरोबरच संबधित कार्यालये, आस्थापना यांच्या नोडल अधिकाऱ्यांना एक आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. याद्वारे संबंधित अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांची अंतिम यादीला मंजुरी देतील. हे सर्व काम राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून करण्यात येईल.

सर्व प्रक्रिया झाल्यावर कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनवर ‘ई-पास’चा “क्यू-आर” कोड येईल. या ई-पास सोबतच संबंधित प्रवाशी कर्मचाऱ्याला उपनगरी रेल्वेचे नेहमीचे तिकीट/मासिक पास खरेदी करून प्रवास करता येईल.

अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केलेली कार्यालये, आस्थापना, संस्था यांना अशी एकत्रित माहिती सॉफ्ट कॉपी (एक्सेल शीट) मध्ये द्यावी लागेल. ही माहिती कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत २७ जुलैपर्यंत सादर करता येईल. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि पत्ता असा – श्री. प्रमोद सावंत किंवा देवांश शुक्ला किंवा ज्योतीमणी. टेक्नॉलॉजी सेल, पाचवा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सीपी ऑफिस कंपाऊनड, डॉ. डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटच्या समोर, मुंबई – ४००००१ ( संपर्क मोबाईल: ८८२८११९७०६)⭕

Previous articleजिओचा बेस्ट प्लान, ३४९ रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉल 🛑
Next articleधर्म-जातीच्या पलीकडे! 750 हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना, कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या ७ देवदूतांना मानाचा सलाम!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here