Home Breaking News धर्म-जातीच्या पलीकडे! 750 हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना, कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या...

धर्म-जातीच्या पलीकडे! 750 हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना, कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या ७ देवदूतांना मानाचा सलाम!

124
0

पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक)-धर्म-जातीच्या पलीकडे!
750 हून अधिक कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना, कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या ७ देवदूतांना मानाचा सलाम!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसा अनेक जाती-पातीच्या अफवांना पेव फुटले. या अफवांपायी पालघरमध्ये हत्याकांड घडले तर कोरोनाच्या नावाने भीतीचे वातावरण असतानाही मुंबईतील ७ जणांनी अद्भूत कार्य केले. धर्म-जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले. 750 हून अधिक मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर पवित्रपणे अंत्यस्कार केले. या ७ देवदूतांच्या कार्यापासून प्रेरित होऊ न एक-एक करत आजच्या घडीला २०० हून अधिक जण या कार्यात सहभागी झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होऊ लागली. अनेकांना मृत्यूने कवटाळले. एका मागोमाग रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग शासनापुढे आला. परिणामी रुग्णालयात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडू लागली. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी व लॉकडाऊ नमुळे रुग्णांना रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. सदर बाब लक्षात घेता जामा मशीद र्ट्स्टचे अध्यक्ष शोएब खतीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बन, अ‍ॅण्ड इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटिया हे सात जण मदतीसाठी पुढे आले. यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, जव्हार, मोखाडा आदी परिसरांसह विविध भागात रुग्णांना मदत करण्यास सुरुवात केली.
या सातही जणांनी रुग्णवाहिकेची मोफत सुविधा सुरू केली. यासाठी ६ जुन्या रुग्णवाहिका दुरुस्त करून त्याचा वापर सुरू केला. ही सेवा पुरवताना या देवदुतांनी रुग्णाचा, मृतांची जात-पात, धर्म पाहिला नाही. सरसकट सर्वांना मदतीचा हात देत माणुसकी जपली. अनेक केसमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक घाबरत तर अन्य काही केसमध्ये नातेवाईक स्वत: क्वॉरंटाईन असल्याने त्यांना अंत्यविधी करता येत नव्हता. अशा वेळी हे देवदूत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर पवित्रपणे कब्रस्तान, स्मशानात पोहोचवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करत. सदर मदतकार्य करत असताना या देवदुतांनी पुरेपूर काळजी घेऊ न माणुसकी जपत आहेत.
शोएब खतीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बन, अ‍ॅण्ड इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटिया यांनी एकत्रित येऊ न कोरोना संकट काळात सुरू केलेल्या मदतकार्याला प्रेरित होऊ न आजच्या घडीला २०० हून अधिक मदतीसाठी पुढे आले आहेत.
या सर्वांच्या कार्याला ‘सतर्क पोलीस टाईम्स’ परिवाराचा मानाचा सलाम!

Previous articleलोकल प्रवासासाठी ई-पास लागणार; जाणून घ्या कसा मिळवाल ई-पास 🛑
Next articleअयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here