Home कोकण चिवला बीचवर समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिलेला स्थानिकांनी वाचवले 🛑

चिवला बीचवर समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिलेला स्थानिकांनी वाचवले 🛑

154
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 चिवला बीचवर समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिलेला स्थानिकांनी वाचवले 🛑
✍️ सिंधुदुर्ग : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मालवण :⭕ शहरातील चिवला बीच येथील समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी-पुणे येथील एका ५७ वर्षीय महिला पर्यटकास स्थानिकांनी तरुणांनी वाचविले. ही घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. आता त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे येथील २० जणांचा समूह दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यास आले होते. यातील अनेक महिला चिवला बीच येथील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यास उतरले. यात साडी परिधान केलेली एक ५७ वर्षीय महिला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत होती.

हा प्रकार किनाऱ्यालगत असलेल्या स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या निदर्शनास येताच फ्रान्सिस फर्नांडिस, सागर धुरी, स्वीटन सोज, कृष्णा सावंत या तरुणांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिला पर्यटकाला समुद्रातून सुखरूप किनाऱ्यावर आणले. महिलेच्या पोटात पाणी गेल्याने किनाऱ्यावर त्या महिला पर्यटकावर प्राथमिक उपचार करण्यात आले. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

महिलेचा प्राण वाचविणाऱ्या या पर्यटन व्यावसायिक तरुणांचे कौतुक होत आहे.सध्या दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असल्याने ते समुद्रस्नानाचा आनंद घेण्यास पाण्यात उतरतात. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना घडते.

त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरण्यापूर्वी स्थानिकांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करायला हवे.⭕

Previous articleरिक्षा चालक काकांचा प्रामाणिकपणा. MH-48-N-7175 🛑
Next articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.राजू जानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here