Home पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.राजू जानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला 🛑

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.राजू जानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला 🛑

130
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.राजू जानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला 🛑
✍️ सांगली : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सांगली :⭕सांगली मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या वादातून भाजपचे आ.गोपीचंद पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आटपाडी येथे काल प्राणघातक हल्ला केला.

इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी हल्ल्यात राजू जानकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली मधील आदीत्य हाॅस्पीटल येथे उपचार सुरू आहेत.

आज राजू जाणकार यांची सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आदरणीय श्री.जयंत पाटील साहेबांनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तात्काळ जाऊन तब्बेतीची व संबंधित प्रकारची विचारपूस केली. संबंधित घडलेल्या घटनेबद्दल राजू जानकर यांनी आम्हाला इत्यंभूत माहिती सांगितली. या वेळी आदित्य हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांच्या सोबत चर्चा करून राजू जानकर यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व सहकार्य करण्याची डॉक्टरांना विंनती केली. सोबतच राजू जानकर यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधला.

कायदेशीर लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे राजू जानकर यांच्या सोबत असेल. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष राहुल पवार, अरूण आजबे,भरत देशमुख,प्रमुख उपस्थित होते.

महापालिकाक्षेत्रामधील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.⭕

Previous articleचिवला बीचवर समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिलेला स्थानिकांनी वाचवले 🛑
Next articleरुपालीताई चाकणकर महाविकास आघाडी व पुणे शहराच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here