Home Breaking News 🛑 मुस्लिम मामा…! हिंदू भाची या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन 🛑

🛑 मुस्लिम मामा…! हिंदू भाची या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन 🛑

98
0

🛑 मुस्लिम मामा…! हिंदू भाची या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन 🛑
अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर/शेवगाव⭕’खराची एक तो धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे वाक्य खरं करून दाखवणारी एक सकारात्मक घटना समोर आली आहे. आज जातीच्या नावाखाली अनेकांचे बळी जात आहे. ऑनरकीलिंग सारख्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावातील घटनेनंतर तुम्ही हे सगळं विसरून जालं.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव जवळील मुंगी या छोट्या गावात एका लग्नात एका मुस्लीम मामाने आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलीचं कन्यादान केलं आहे. इतकंच नाही तर लेकही बापाला निरोप देताना जशी रडते तसं अश्रू तिच्या डोळ्यांत होते. या घटनेची आज सर्वदूर चर्चा होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे.

नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आई-वडिलांकडे राहत आहेत. माहेरीच छोटं-मोठं काम करून त्यांच्या मुलींना मोठं केलं. मुलींच्या आईला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे.

बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन भावाचे कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली.

शेवगाव तालुक्यातील मुंगी याठिकाणी झालेल्या या लग्नात फोटोग्राफरच्या एका क्लिकने मन सुन्न झालं आणि सामाज्याच्या ठेकेदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. खरंतर हीच आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे.

त्यामुळे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणूसकी हा खरा धर्म प्रत्येकाला ओळखता येणं गरजेचं आहे…..⭕

Previous article🛑 अरुण गवळी ( डॅडी ) यांच्या गणपतीचे उत्सवात विसर्जन 🛑
Next article🛑 *स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here