Home राजकीय चंद्रकांत पाटलांचे आयुक्तांना पत्र

चंद्रकांत पाटलांचे आयुक्तांना पत्र

93
0

⭕चंद्रकांत पाटलांचे आयुक्तांना पत्र⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : शहरातील नऊ मीटर रस्त्यांच्या रुंदीअभावी रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास चालना देण्यासाठी त्वरीत योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी कोथरूडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

या पुनर्विकासासाठी नऊ मीटरपेक्षा कमी रस्त्यांचे रुंदीकरण करून ते नऊ मीटर करणे गरजेचे आहेत. त्यासाठीची योजना तयार करून ती शहरभर अमलात आणून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी सूचना पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

शहरातील पेठांमध्ये राहणारी लोकवस्ती साधारण १९८०नंतर पुण्याच्या बाह्य भागांत स्थलांतरीत झाली आहे. हे स्थलांतर विशेषत: पुण्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात झाले आहे. या ठिकाणी झालेल्या इमारती या २५ ते ३० वर्ष जुन्या झाल्या आहेत. या इमारती बांधल्या तेव्हांच्या प्रचलित नियमाप्रमाणे बऱ्याच ठिकाणचे रस्ते हे नऊ मीटर पेक्षा कमी रुंदीचे आहेत. मात्र, २०१७च्या नियंत्रण नियमावलीनुसार ‘टीडीआर’ वापरण्यासाठी किमान ‌नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांची गरज आहे. त्यामुळे सध्या अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी योजना तयार करून ती त्वरीत संपूर्ण शहरांत लागू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here