Home बुलढाणा शिवसेनेच्या पदाधिकारी सत्कार मेळाव्यात धुळघुस घालणाऱ्या वर कारवाई करा!

शिवसेनेच्या पदाधिकारी सत्कार मेळाव्यात धुळघुस घालणाऱ्या वर कारवाई करा!

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0050.jpg

शिवसेनेच्या पदाधिकारी सत्कार मेळाव्यात धुळघुस घालणाऱ्या वर कारवाई करा!

संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

बुलढाणा येथे शिवसेनेच्या पदाधिकारी सत्कार मेळाव्यात धुळघुस घालणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणी संदर्भात संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार यांना 5 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याबाबत 3 सप्टेंबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, छगन मेहरते यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती दरम्यान सातत्याने दादागिरीच्या भूमिकेतून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुत्राच्या नेतृत्वात यांचे 20 ते 25 समर्थक यांनी येऊन कार्यक्रमस्थळी धुडगूस घातला व खुर्च्यांची फेकफाक केली यावेळी महापुरुषांच्या प्रतिमा देखील खाली पडल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांना लोटपाठ करून मारहाण सुद्धा केली. या घटनेचा जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक तीव्र शब्दात निषेध करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसार जिल्ह्यातील शिवसैनिक शांततेची भूमिका ठेवून आहेत. जिल्हा व पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशा आशयाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आलेला आहे. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार पाटील, रमेश चिपडे , नंदकिशोर विश्वकर्मा , विजय मारोडे, शुभम घाटे शहराध्यक्ष, विजय मारोडे,अमोल ठाकरे, धनंजय अवचार, राहुल मेटांगे, रामदास मिसाळ , जगन्नाथ मिसाळ, अनिल सौदागर आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

बातमी फोटो कॅप्शन
नायब तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक

Previous articleअतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची यादी घरात बसून चहाच्या कपात लाभार्थी निवडून केली तयार!
Next articleआविसचा दणका : प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here