Home गडचिरोली आविसचा दणका : प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे..!!

आविसचा दणका : प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे..!!

113

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0062.jpg

आविसचा दणका : प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे..!!                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार)

नगरपंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या लेआऊटस मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, तसेच वीज व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लेआऊट पाडणाऱ्या संबधित कंत्राटदारांची असते. मात्र अहेरी नगरपंचायत अंतर्गत टाकलेल्या लेआऊटस मध्ये अनेक त्रुटी तसेच सोयीसुविधा उपलब्ध न करून देताच विकण्यात आले.तसेच खाजगी लेआऊटस मध्ये नगरपंचायतीतर्फे कोट्यवधी रुपयांची निधी वापरून नियमबाह्यरित्या रस्ते, नाली बांधकाम व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या संदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवर यांनी रीतसर तक्रार दाखल केली होती व तात्काळ संबधित गैरप्रकार व भ्रष्टाचाराचा चौकशी करीत आमरण उपोषणाला बसले होते.सदर उपोषणाची गंभीर दखल घेत अहेरी येथील उपविभागीय अधिकारी अंकित यांनी संबधित कंत्राटदारांना बोलावून येत्या २ महिन्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश दिले आहे. तसेच सदर लेआऊटस मध्ये नियमबाह्य रित्या नगरपंचायतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिले होते. त्याची चौकशी सुरु झाली असून त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. आवीसच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे..!!

Previous articleशिवसेनेच्या पदाधिकारी सत्कार मेळाव्यात धुळघुस घालणाऱ्या वर कारवाई करा!
Next articleआरेंदा येथे वैयक्तिक वन हक्क दाव्याचे अर्जांची वाटप माजी जि.प.अध्यक्ष – सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.